• Welcome To

    Maharashtra Police Mega City,
    Lohgaon, Pune.

आमच्या विषयी

पुणे शहर हे विद्येचे माहेरघर असून या शहराचे शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक व आय. टी. क्षेत्रातील वाढते महत्व तसेच येथे उपलब्ध असलेल्या विविध वैद्यकीय सुविधा व सर्व ऋतूतील आल्हाददायक हवामान पाहता सेवानिवृत्तीनंतर कायमस्वरूपी पुण्यात स्थायिक होऊ इच्छिणारे पोलीस कर्मचारी व अधिकारी खूप आहेत. तसेच आपल्या कुटुंबियांच्या व मुलामुलींच्या भावी शिक्षणासाठी पुण्यात आपलं स्वतःचे घर असावे अशी मनस्वी इच्छा बाळगणारे ही पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची मोठी संख्या पोलीस दलात आहे. परंतु सध्याचे आकाशाला भिडलेले घरांचे दर पाहता अशा सर्वांनाच आपोआप आपल्या या सुप्त इच्छेला नाईलाजाने मुरुड घालावी लागते. या पार्श्वभूमीवर पुणे येथे खास पोलीसांसाठी प्रकल्प राबवून त्याव्दारे सर्वांना परवडतील अशा किंमतीत दर्जेदार घरे उपलब्ध करून देता येतील यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न चालू होते, व त्या प्रयत्नांना नुकतेच यश आले आहे. सदर प्रकल्प लोहगांव परिसरात पोलीस आयुक्त कार्यालयापासून सुमारे १६ किलोमीटर व लोहगांव पासून ४ किलोमीटर अंतरावर असून त्याच्या एका बाजूने वॉटरपार्क व श्री. विखे पाटील यांचे कॉलेज व दुसऱ्या बाजूने माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांचे मराठवाडा मित्र मंडळ(MMIT) चे कॉलेज आहे. तसेच प्रकल्पाच्या जवळून ३०० फुटाचा नियोजित रोड ही जात आहे. एकूण ११६ एकर निसर्गरम्य जागेत ५२४८ निवासी सदनिका व १६० व्यापारी गाळे सदर प्रकल्पामध्ये संस्थेच्या सभासदांकारिता उपलब्ध होणार आहेत. बी. ई. बिलोमारीया, मुंबई ही बांधकाम क्षेत्रातील विख्यात कंपनी अत्यंत वाजवी दरात हा प्रकल्प तयार करून देत आहे. व सदर प्रकल्पाचे काम सध्या लोहगांव, पुणे येथे प्रगतीपथावर आहे.

RTGS बँक खात्याची माहिती.

ACCOUNT NAME: MPMC CHS LTD PUNE
BANK NAME: UNION BANK OF INDIA
CURRENT A/C NO: 321701010037685
IFSC CODE: UBIN0532177

महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी, लोहगाव, पुणे - बांधकामाविषयी माहितीची चित्रफीत

पोलीस प्रोजेक्ट्च्या मालकीच्या आणि सार्वजनिक सुविधा

महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी, लोहगाव, पुणे - 3D ANIMATION FILM

महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी, लोहगाव, पुणे.
साईटवरील तयार सैंपल फ्लॅट ( बी. एच. के. / ३ बी. एच. के. )